आहारवेद – आहारातून आरोग्य संवर्धन काय खावे? आरोग्यदायी फळांचे महत्त्व

पडवळ – ग्रामीण भागामध्ये सहसा प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी मांडवावर पडवळे लोंबताना दिसतात. लांबलचक त्वचेवर फिकट हिरवे पट्टे, जाड सर्पाकृती आकाराचे पडवळ असल्यामुळे इंग्रजीमध्ये त्याला ‘स्नेक गोर्ड’ असे म्हणतात. मराठीत ’पडवळ’, हिंदीमध्ये ’चिचिण्डा’, संस्कृतमध्ये ‘पटोल’, तर शास्त्रीय भाषेत ‘टीचोसानथिस कुकुमेरिना’ (Trichosanthes
Cucumerina) या नावाने ओळखली जाणारी पडवळ ही वनस्पती ’कुकर बिटेसी’ या कुळातील आहे. पडवळ ही फळभाजी संपूर्ण भारतात आढळते. त्याम ध्ये दक्षिण भारतात फारच लोकप्रिय आहे. पडवळाचा वेल वर्षायू व भरभर वाढणारा असतो. पडवळाचा वेल हा सहसा उष्ण हवेत वाढतो.

औषधी गुणधर्म आयुर्वेदानुसार – पडवळ हे शीतल, रेचक, सारक, कृमीनाशक आणि वांतीकारक आहे. आधुनिक शास्त्रानुसार : कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, रिबोफ्लेविन, थायमिन, कॅरोटीन, नायसिन, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, स्निग्धता हे सर्व पोषक घटक पडवळात असतात.

उपयोग – पित्तप्रकोपाने ताप आल्यास पडवळाचा काढा घ्यावा. पडवळ हे रेचक गुणधम र्ाचे असल्याने पोट साफ होऊन ताप उतरतो. ताप अधिक प्रमाणात असल्यास या काढ्यात कोथिंबीर, काडेचिराईताचा रस व मध घालून प्यावा. पडवळामध्ये कमी उष्मांक असल्यामुळे हृदयरोग, मधुमेह या आजारावर ते उत्तम प्रकारचे टॉनिक आहे. या आजारामध्ये पडवळ नियमित खाल्ल्या मुळे रसरक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर होतो व रक्तपुरवठा सुरळीत होऊन वरील आजार कमी होतात. लठ्ठपणा असणार्‍या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे पडवळाचा वापर करावा.

छातीत धडधडणे, दुखणे, चमका मारणे इत्यादी तक्रारींवर पडवळाचा रस दिवसातून तीन वेळा दोन चमचे घ्यावा. पडवळ कृमीनाशक असल्या मुळे पोटातील कृमी शौचावाटे पडून जाण्यासाठी पडवळाच्या बियांची पूड एक-एक चमचा दोन वेळा घ्यावी. अपचन, पोटात गुबारा धरणे, शौचास साफ न होणे, या तक्रारीवर पडवळाच्या बियांची पूड एक एक चमचा दोन वेळा घ्यावी. यामुळे पोटातील गुबारा कमी होऊन शौचास साफ होते. सांधे सुजून दुखत असतील, तर अशा वेळी पडवळाच्या पानांचा रस कोमट करून सांध्याच्या ठिकाणी लावावा. साध्यांची सूज कमी होते. पडवळाचे मूळ हे रेचक गुणधर्माचे असल्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचाविकारांवर ते चांगल्या प्रकारे परिणाम करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. पडवळाच्या कोवळ्या फांद्या व वाळलेली फ ुले यांचा काढा साखर घालून घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते.

सावधानता – अति जुने व खूप पक्व झालेले पडवळ आहारात वापरू नये. याने पोटदुखी होऊ शकते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा