दिव्य चिंगारी-भाग – 1 (दिव्य चिंगारीस पेटवा) शाकाहारी आहार

कर्माचा सिध्दांत असे सांगतो कि जेव्हाही कोणती क्रिया होते प्रतिक्रिया त्याचा परिणाम आहे. हिन्दु, बौध्द, शिख आणि जैन इ. पुर्वे कडील धर्मांची एक प्रम ुख मान्यता आहे कि कर्माचा सिध्दांत आम्हाला आत्मिक स्तरावर प्रभावित करतो. कर्माचा सिध्दांत सांगतो कि, आमचे सर्व विचार, वचन (बोल) तसेच कार्य यांचा हिशोब बला जात असतो. याचमुळे जेव्हा आमचे विचार, वचन तसेच कार्य चांगले असतील तर आम्हांला चांगलेच प्राप्त होईल. परंतु जेव्हा आमचे विचार, वचन (बोल) तथा कार्य वाईट सतात, तेव्हा त्यांचा दंड भोगावा लागतो. हे जगातील कायद्यासारखेच आहे. जो दंड आणि पुरस्काराच्या आधारावर बनलेला आहे. उदाहरणार्थ बाईबल मध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही कोणाचा डोळा फोडला तर तुमचा डोळा फोडला जाईल जर तुम्ही कोणाचा दात तोडला तर तुमचा दात तोडला जाईल, याच प्रकारे कितीतरी धर्म विश्वास ठेवतात कि, जीवनात आमच्याद्वारे केल्या गेलेल्या कार्यांचा निर्णय होत असतो ज्याच्या आधारावर आम्हांला पुढील जन्म मिळत असतो. संत आम्हाला जे आत्मिक मंडळाचे अन्वेषण करतात तथा प्रभुला प्राप्त करतात, आम्हाला त्यांच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर आपली शिकवण देतात. यानुसार ’ज्योति’ व ’श्रुति’ च्या मार्गाच्या दिक्षेसाठी शाकाहारी जीवनाची अट घालण्यामागे मुख्य कारण हे आहे कि सद्गुरूंना असे वाटते कि आम्ही अजुन कर्माचा संचय करू नये, ज्याची आपल्याला परतफेड करावी लागेल. जे कर्माच्या सिध्दांतावर विश्वास ठेवतात ते मानतात कि जर आम्ही एका पशुची हत्या केली तर आम्हाला त्याची प्रतिक्रिया भोगावी लागेल. बौध्द धर्मात अशा अनेक जातक गोष्टी सांगितलेल्या आहे. ज्यामध्ये व्यक्तिंनी त्यांच्या पुर्वजन्मात जे काही केले होते, त्याचा त्यांना पुढच्या जन्मामध्ये एकतर योग्य दंड मिळाला किंवा योग्य पुरस्कार मिळाला. आम्ही कर्माच्या सिध्दांतास मानो अथवा न मानो हि गोष्ट विचार करण्यासारखी आहे कि संत रहस्यवादिनी निज अनुभवाच्या आधारावर कर्माच्या सिध्दांताची शिकवण दिली आहे. ज्या व्यक्तिंना स्वतः कर्माच्या सिध्दांताचे ’प्रमाण हवे असेल ते तसेत करू शकतात जसे सद्गुरू आणि संतांनी केले आहे. ’ते देहाभासाच्या वर येऊन आन्तरिक मंडळात भ्रमन करू शकतात आणि आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन करू शकतात. असे केल्याने सृष्टिच्या नयमाचा स्पष्ट माहिती त्यांना प्राप्त होईल आणि ते त्यानुसार कार्य करू शकतात. ज्यांना मृत्यु सारखा अनुभव आला आहे त्यांनी वर्णन केले कि ते। प्रकाशाच्या मंडळात पोहचले त्यांनी त्यांच्या जीवनाचे पुनरावलोकन केले. त्यांनी जे काही चांगले किंवा वाईट केले होते ते पाहिले. त्यांना फक्त यास बघण्याची संधीच मिळाली नाही तर त्यांनी ते सर्व काही अनुभवले जे दुसर्‍यांनी अनुभवले होते, जेव्हा त्यांनी त्यांच्या बरोबर चांगले किंवा वाईट केले.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा