डाळ-बटाटा भजी

साहित्य – 250 ग्रॅम उकडलेले बटाटे, 5 ग्रॅम बारीक चिरलेल्या पाकळ्या, बारीक चिरलेला 100 ग्रॅम कांदा, एक लिंबू, एक चम चा गरम मसाला, बारीक चिरलेली एक गुच्छा कोथिंबीर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेल्या 3-4 हिरव्या मिरच्या, तळण्यासाठी तेल, एक कप बेसन, 100 ग्रॅम उकडलेल्या मिक्स डाळी, 100 ग्रॅम ब्रेडचा चुरा.

कृती – उकडलेले बटाटे सोलून, कुस्करून त्यात चवीनुसार मीठ व अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. आता त्या मिश्रणाच्या गोळ्या बनवा. यानंतर उकडलेल्या मिक्स डाळींमध्ये बारीक चिरलेला कांदा, आले, लसूण, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर मिसळून व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यामध्ये उरलेल्या अर्ध्या लिंबाचा रस व गरम मसाला मिसळा. हा मसाला बटाट्याच्या गोळ्याच्या लाटीत वडीसारखा भरून वडीला थोडा लांबट आकार द्या. बेसनाचे दाट पीठ बनवा. प्रत्येक वडी बेसनाच्या पीठात बुडवून तिच्यावर ब्रेडचा चुरा लावा. कढईत तेल तापवून त्यात या वड्या सोनेरी-भुरकट रंगात तळून घ्या. भजी तयार होतील. गरमागरम भजी टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा