मूत्रपिंडांचं आरोग्य बिघडल्यास…

मूॅत्रपिंडं हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव. मूत्रपिंडं शरीरातली घाण, विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम अविरत करत असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह आदी कारणांमुळे मूत्रपिंडांना नुकसान पोहोचतं आणि शरीरातले विषारी घटक बाहेर टाकले जात नाहीत. मूत्रपिडांच्या कार्यात अडथळे आल्यास शरीरात काही बदल घडतात आणि त्याची लक्षणंही जाणवू लागतात. मात्र काही वेळा या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. पुढे त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच मूत्रपिंडांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. मूत्रपिंडांच्या आरोग्याशी संबंधित लक्षणांविषयी… मूत्रपिंडं शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्याचं काम करतात. मात्र त्यांच्या कार्यात अडथळे आल्यास हे अतिरिक्त सोडियम शरीरात साचून राहतं. यामुळे पाय तसंच पोटर्‍यांना सूज येऊ लागते. डोळे, चेहरा सुजण्यासारखी लक्षणंही दिसून येतात. मात्र मूत्रपिंडविकारांमध्ये पाय आणि पोटर्‍या सुजणं हे महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.

थकवा किंवा अशक्तपणा हे सर्वसाधारणपणे यकृताशी संबंधित विकारांचं लक्षण असलं तरी मूत्रपिंडांचं कार्य सुरळीत सुरू नसेल तरी अशक्तपणा जाणवू शकतो. मूत्रपिंडांचा त्रास वाढल्यास रुग्ण अधिकाधिक कृश होत जातो. अशा परिस्थितीत थोड्या घरकामाने किंवा थोडं चालल्यानेही थकवा येतो. रक्तात विषारी घटक साठल्यामुळे असं होऊ शकतं. शरीरात विषारी घटक साचल्यामुळे भूक कमी लागते. परिणामी वजनही कमी होतं. मूत्रपिंडांच्या समस्यांमुळे मळमळणं, उलट्या असे त्रास होऊ शकतात आणि भूक मरते. सर्वसामान्य निरोगी मनुष्याला दिवसातून साधारण सहा ते दहा वेळा लघवीला जायला लागतं. मात्र त्यापेक्षा अधिक काळ जावं लागणं हे मूत्रपिंडंविकाराचं लक्षण असू शकतं. मूत्रपिंडं विकाराच्या अन्य लक्षणांसोबतच त्वचा कोरडी पडली असेल आणि खाजत असेल तर त्रास बराच वाढला आहे असं समजावं. मूत्रपिंडंविकाराचं वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार करून रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. मधुमेह, उच्च रकतदाब आणि उच्च कोलेस्टरॉल असणार्‍या रुग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा