जास्त हळद खाल्ली तर…

हळद खूप आरोग्यदायी असली तरी त्याच अतिसेवन घातक ठरू शकतं. हळदीच्या अतिसेवनाचे दुष्परिणामही समोर येतात. हळदीतला करक्युमिन हा घटक रक्त पातळ करतो. यामुळे छोट्याशा जखमेतूनही बराच रक्तस्राव होतो. हळदीचं अतिसेवन महिलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. हळदीमुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव होऊ शकतो. हळदीमुळे गरोदरपणातही त्रास संभवतो. हळदीचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आई आणि गर्भातल्या बाळावरही दुष्परिणाम होऊ शकतात. गरोदरपणाच्या सुरूवातीच्या काळात जास्त हळद खाल्ल्याने रक्तस्राव होऊन गर्भपातही होऊ शकतो. हळद जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात जळजळ, सूज येणं अशा समस्या निर्माण होतात. इतकंच नाही तर हळदीच्या अतिसेवनाने मूतखड्याचा त्रास होऊ शकतो. यातल्या ऑक्सलेट नामक घटकामुळे शरीरात कॅल्शियम योग्य पद्धतीने शोषलं जात नाही. परिणामी मूतखडा होऊ शकतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा