रताळ्याचे असेही लाभ

नव्या वर्षात बरेच जण वजन कमी करण्याचा संकल्प करतात. वजन कमी करायचं तर व्यायामासोबतच आहारावरही नियंत्रण ठेवावं लागतं. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन करावं लागतं. यासाठी रताळं हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो. थंडीत रताळं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं. रताळं उकडून किंवा भाजूनही खाता येतं. रताळ्याच्या लाभांविषयी…

रताळ्यात अ जीवनसत्त्वासह फायबरही भरपूर प्रमाणात असतं. फायबरयुक्त अन्न खाल्ल्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. भूक कमी लागते आणि खाणंही कमी होतं. यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे भूक लागली तर भाजलेलं रताळं खायला हरकत नाही.

रताळ्यात कॅलरींचं प्रमाणही खूप कमी असतं. कमी कॅलरीयुक्त आहार घेतल्याने वजन नियंत्रणात येतं. 100 ग्रॅम रताळ्यात फक्त 86 कॅलरी असतात. त्यामुळे रताळ्याचं सेवन खूप लाभदायी ठरतं.

रताळ्यात कॉपर, झिंक तसंच सुपरऑक्साइडनामक अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीराची सूज कमी होते. तसंच हे घटक ताणतणावही कमी करतात. यासोबतच प्रथिनं, स्टार्च, जीवनसत्त्वं आणि खनिजं या घटकांमुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते.

रताळ्यात रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे मधुमेहींनी रताळ्याचं सेवन करायला हरकत नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा