अहमदनगर कॅन्टोन्मेंट हद्दीतील वाहन प्रवेश करही लवकरच होऊ शकतो बंद- प्रवेश शुल्क व प्रवेश कर हा तांत्रिक मुद्दा- प्रशासकीय अधिकार्‍यांचे मत

अहमदनगर – कॅन्टोन्मेंट हद्दीत व्यावसायिक वाहनांना आकारण्यात येणारे वाहन प्रवेश शुल्क बंद करण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाने दिल्यानंतर अहमदनगर कॅन्टोन्मेंट हद्दीत काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. तथापि प्रवेश शुल्क आणि प्रवेश कर हा तांत्रिक मुद्दा असून, प्रवेश शुल्काप्रमाणेच प्रवेश करही रद्द होऊ शकतो. मात्र त्यासाठी काहीसा अवधी जाणार असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डास पत्र पाठवून वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या कॅन्टोन्मेंट बद्दीत व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क (व्हीईएफ) आकारणी केली जाते त्यांनाच सदरचा आदेश लागू होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र अहमदनगर कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहन प्रवेश शुल्क (व्हीईएफ) नव्हे तर वाहन प्रवेश कर आकारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रवेश शुल्क आकारणी बंद झालेली असून प्रवेश कर बंद झालेला नाही, असे स्पष्टीकरण बोर्डाने दिले.

परंतु प्रवेश शुल्क आणि प्रवेश कर याबाबत तांत्रिक मुद्दा उपस्थित झालेला असल्याने अनेक नागरिकांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाशी चर्चा केली. सद्यस्थितीत केवळ प्रवेश शुल्क आकारणी बंद झालेली आहे. सदरच्या तांत्रिक मुद्यावर संरक्षण मंत्रालय स्तरावर भविष्यात निर्णय अपेक्षित आहे. प्रवेश शुल्क वाहन प्रवेश कर (व्हीईटी) रद्द होईल. मात्र त्यासाठी काही अवधी जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, कॅन्टोन्मेंट हद्दीत व्यावसायिक वाहनांचे प्रवेश शुल्क रद्द झाल्याच्या पुणे येथील बातम्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे अधिकच संभ्रम निर्माण होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा