आनंदऋषीजीमधील सूक्ष्म व्यायामाद्वारे मोफत मणके विकार उपचारांचा रूग्णांना मोठा लाभ

अहमदनगर – अहमदनगर शहरातील रस्त्यांवरील खड्डयांतून वाहन चालविण्यामुळे अनेकांना पाठीचे, मणक्यांचे विकार जडत आहेत. अशा मणके विकारांवर राष्ट्रसंत आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील आनंदऋषीजी ब्लड बँकेत सूक्ष्म व्यायाम पद्धतीव्दारे मोफत उपचारांची कायमस्वरुपी व्यवस्था कार्यान्वीत आहे. याठिकाणी दररोज सकाळी 10 ते 11 यावेळेत सूक्ष्म व्यायाम पध्दती उपचार तज्ज्ञ प्रसाद जोशी मार्गदर्शन करीत असतात. आतापर्यंत शेकडो रूग्णांना या उपचारांनी आराम मिळाला आहे. स्व.पानाबाई लक्ष्मीचंद रूणवाल (विजापूर, कर्नाटक) यांच्या सहकार्याने ही सेवा सुरु आहे. यात कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे, गुडघेदुखी आदी विकारांनी त्रस्त रूग्णांना व्यायामाच्या साध्यासोप्या आणि तितक्याच परिणामकारक पध्दती शिकवल्या जातात. यातून रूग्णांना हमखास गुण येत असून अनेकांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बुर्‍हाणनगर येथील 30 वर्षीय विकी वसंत लिमगिरे यांनी सांगितले की, माझी कंबर अनेक महिन्यांपासून दुखत होती. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होवूनही फरक पडत नव्हता. यानंतर मी प्रसाद जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम सुरु केला. पाच सहा दिवसांतच चांगला फरक पडतो. आता मी नियमित व्यायाम करीत असल्याने त्रासातून मुक्त झालो आहे.

मीरा सतीश नराल यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून मला मान व हात दुखीचा त्रास सुरु होता. चार महिन्यांपूर्वी पायाचे दुखणेही सुरु झाले. मी प्रसाद जोशी यांना दाखविले. त्यांनी मला अतिशय साधेसोपे व्यायाम प्रकार सांगितले. ते मी नियमित केले व आठ दहा दिवसांतच खूप बरे वाटू लागले. आता माझा त्रास कमी झाला असून संस्थेचे आभार मानावे तितके कमी आहेत. 72 वर्षीय कमल आढाव यांनी सांगितले की, दोन तीन वर्षांपासून मला गुडघेदुखीचा त्रास होता. मी या केंद्रात येवून उपचार घेतले. येथे शिकवल्याप्रमाणे व्यायाम करण्यास सुरुवात केली. मला पुष्कळ फरक वाटतोय, त्रासही खूप कमी झाला आहे. चंद्रशेखर मलिकापेटकर यांनी सांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांपासून मानेचा व अंगदुखीचा त्रास होत होता. अनेक ठिकाणी उपचार केले. प्रसाद जोशी सरांकडे आल्यावर त्यांनी सूक्ष्म व्यायाम प्रकार समजावून सांगितले. त्यानुसार नियमित व्यायाम सुरु केला आणि छान सुधारणा होत आहे. अतिशय प्रभावी अशा या उपचार पध्दतीचा लाभ जास्तीत जास्त रूग्णांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे उपचार नियमितपणे सुरु असून, अधिक माहितीसाठी संपर्क 9921272306

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा