विकासकामातून अनिल बोरुडे यांनी प्रभागातील नागरिकांच्या विश्वास संपादन केला-महापौर रोहिणीताई शेंडगे

प्र.क्र.8 मधील पंचशील नगर मधील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

अहमदनगर – बालिकाश्रम रोड परिसरातील विकास कामांमध्ये माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांचे मोठे योगदान आहे. विकास कामे करीत असताना त्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन कामे केली आहे. नियोजनबद्ध प्रभागाचा विकास आराखडा केला असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने विकास कामे मार्गी लावत आहे जमिनी- अंतर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याच्या लाईन, टाकून झाले आहे. त्यानंतर रस्त्याची विकास कामे हाती घेतली आहे. श्री बोरुडे दाम्पत्य यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी व लहान मुलांसाठी स्वखर्चातून उद्यान उभारले आहे. बालिकाश्रम रोड परिसराचा विकास कामातून कायापालट झाला असून याचे श्रेय अनिल बोरुडे यांना जाते. यापुढील काळातही प्रभाग क्रमांक 8 च्या विकास कामासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत. महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरुडे यांच्या मागणीनुसार प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन उभारणार असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले. मनपा महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरुडे यांच्या प्रयत्नातून प्र.क्र.8 मधील पंचशील नगर मधील रस्ता कॉंक्रिटीकरण कामांचा शुभारंभ महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, रत्नाकर कुलकर्णी आदी नागरिक उपस्थित होते.

मनपा महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या की, महापौर शेंडगे या प्रभाग क्र.8 चे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासाला मोठा निधी प्राप्त होणार आहे. याचबरोबर प्रभागातील आम्ही चारही नगरसेवक विकास कामासाठी पाठपुरावा करीत आहे. पुढील काळात मोठा निधी प्राप्त होऊन टप्प्या-टप्प्याने विकासकामे मार्गी लागतील. प्रभाग क्रमांक 8 हा विस्ताराने मोठा प्रभाग आहे. कल्याण रोड परिसरामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये विविध विकास कामे मंजूर करून मार्गी लावली आहे. नियोजनबद्ध विकास कामे केल्यामुळे प्रभागाचा समतोल विकास झाला आहे. प्रभागातील नागरिकांना नागरी प्रश्नासाठी महापालिकेकडे कधीही जावे लागत नाही आम्ही प्रभागातील नागरिकांच्या मागणी आधिच प्रश्न मार्गी लावतो प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून पुढील काळामध्ये प्रभाग 8 हा शहराच्या विकासात भर घालणार व मॉडेल प्रभाग म्हणून ओळखला जाणार असल्याचे त्या म्हणाले. शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले की,अनिल बोरुडे यांचे काम कौतुकास्पद आहे. वार्डातील नागरिकांचे ते लाडके नगरसेवक म्हणून ओळख आहे. विकास कामाबरोबर नागरिकांच्या सुख दुःखामध्ये शामिल होऊन प्रश्न सोडवतात प्रभागाचे विकास कामाच्या निधीसाठी कायमच मनपाकडे पाठपुरावा करीत असल्यामुळे मोठा निधी प्राप्त होऊन प्रभागातील विकासकामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान फुलसौंदर व गणेश कवडे आदींची भाषणे झाली. रत्नाकर कुलकर्णी यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा