मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज मंत्राने साप उतरवता येतो का?

साप चावल्यावर खेड्यापाड्यात मांत्रिकाला वा साप उतरवणार्‍याला बोलावतात. तो काहीतरी मंत्र म्हणतो व सापाचे विष उतरते. खरेच का असे होते? यात वैज्ञानिक सत्य असे आहे की, सापाच्या विषावर प्रतिविष वा अँटीस्नेक व्हेनम हेच एक परिणामकारक औषध आहे. सोबत ऍट्रोपीनसारख्या औषधांचाही उपयोग होतो. मग मांत्रिक साप कसा काय उतरवतो? सापाच्या भारतात आढळणार्‍या 216 जातींपैकी फक्त 52 जाती विषारी असतात. दुसरे म्हणजे विषारी साप प्रत्येक चावण्याच्या वेळी विष टाकेलच असे नाही. त्यामुळे बर्‍याचदा चावणारा साप हा एकतर विषारी नसतो वा त्याने चावताना विष टाकलेले नसते. त्यामुळे मांत्रिकाने मंत्र टाकला काय अन् न टाकला काय, तो आपोआपच उतरणार असतो. दुसरे म्हणजे साप उतरला, तर श्रेय मांत्रिकाला मिळते; पण व्यक्ती दगावली तर, ‘‘मांत्रिकाकडे आणायला उशीर झाला’’, ‘‘वावड चिवड झालं होतं’’ किंवा ‘‘श्रद्धा नसल्याने झालं बघा’’ अशा सबबीखाली मांत्रिक सुटतो व लोक स्वतःच्या दैवाला दोष देत बसतात; पण या प्रकारामुळे असल्या मांत्रिकांचे फावते. विषारी साप चावला, तर मांत्रिक कोणत्याही मंत्राने त्याचे विष उतरवू शकणार नाही. उपचार न केल्यास व्यक्ती हमखास बळी पडेल. त्यामुळे मंत्रतंत्राच्या नादी न लागता आधुनिक औषधोपचार घ्यावे, हेच चांगले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा