मखाना-शेंगदाणा

साहित्य – 100 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम मखाने, 1 मोठा चमचा कांद्याची पेस्ट, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, 2 मोठे चमचे टोमॅटो पेस्ट, अर्धा चमचा धनेपूड व जिरेपूड, 1 चमचा वेलची दाणे, थोडीशी हळद व गरम मसाला, मिरची पूड व मीठ चवीनुसार, अर्धा मोठा चमचा किशमिश, 1 मोठा चमचा तेल.

कृति – शेंगदाणे कपभर पाण्यात उकडून घ्या व त्यांच्या साली काढून ठेवा. वेलची दाणे भरड वाटून घ्या. पॅनमध्ये तेल तापवून मखाने तळून घ्या व टोमॅटो पेस्ट टाका. ती परतल्यानंतर हळद, मीठ, धने- जिरे पूड टाका. मसाल्याला तेल सुटू लागेल तेव्हा शेंगदाणे, मखाने व किशमिश टाकून दोन मिनिटे परता व कपभर पाणी ओतून शिजवा. गॅस मंद ठेवा. चिरलेल्या कोथिंबिरीने व गरम मसाल्याने सजवून सर्व्ह करा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा