बैकालची कमाल

रशियातलं बैकाल हे जगातलं सर्वात खोल आणि मोठ्या आकाराचं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. या सरोवरात जगात उपलब्ध असणार्‍या गोड्या पाण्यापैकी 20 टक्के पाणीसाठा आहे. हे सरोवर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असून सध्या हे सरोवर गोठलेलं आहे. रशियात प्रचंड थंडी पडली असून बैकाल सरोवराच्या परिसरातलं तापमान उणे चार अंशांपर्यंत घसरलं आहे. पारा घसरल्यामुळे या सरोवरात दोन मीटर जाडीचा बर्फ साठला आहे. बैकाल सरोवर गोठल्यानंतर इथे अनोखं दृश्य पहायला मिळतं. या सरोवरात हरितवायू उत्सर्जनास कारणीभूत ठरणारा मिथेन वायूही असल्यामुळे त्याचे बुडबुडेही दिसून येतात. सरोवरातलं पाणी गोठल्यावर या वायूचे बुडबुडेही गोठतात. बैकाल सरोवरात मिथेन वायूचं प्रमाण प्रचंड आहे. इथला सगळा मिथेन वायू वातावरणात मिसळला तर पृथ्वीच्या तापमानात खूप मोठी वाढ होईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मात्र अशी परिस्थिती कधीच उद्भवणार नाही. कारण गोठल्यानंतर इथलं पाणी मिथेन वायूला बाहेर पडू देत नाही. याच कारणामुळे पृथ्वी सुरक्षित आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा