भरारी भारतीय प्रज्ञावंतांची

भारतात जन्माला आलेला, शिक्षण घेतलेला एखादा माणूस परदेशातील एखाद्या मोठ्या कंपनीचा प्रमुख होतो, तेव्हा संपूर्ण देशाचा ऊर अभिमानाने भरून येतो. परंतु असे एकदोघे नव्हे तर असंख्य भारतीय तरुण आपल्या विद्वत्तेच्या आणि कष्टाळूपणाच्या जिवावर परदेशातील मोठ्या कंपन्यांमधील वरिष्ठ जागी जाऊन बसले आहेत. मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन उच्च शिक्षणासाठी हैदराबादचा एक तरुण अमेरिकेत जातो. शिकागोमध्ये एमबीएचा अभ्यास करतो. त्यानंतर मायक्रोसिस्टिम नावाच्या कंपनीत नोकरी करतो. 1992 मध्ये मायक्रोसॉफ्ट या जगातील सर्वांंत मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत त्याला काम मिळते आणि अवघ्या दोन वर्षांत म्हणजे 2014 मध्ये हा तरुण मायक्रोसॉफ्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ बनतो, ही कुणालाही अद्भुतरम्य कहाणीच वाटेल. परंतु हे वास्तव आहे. या जिगरबाज तरुणाचे नाव सत्या नडेला. मायक्रोसॉफ्टचे ते अध्यक्षही आहेत. त्यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपट वाढली. ही गौरवगाथा केवळ सत्या नडेला यांनीच लिहिली असे नाही. मूळ भारतीय वंशाचे असे कितीतरी तरुण अमेरिकेसह जगाच्या विविध भागांत आपापल्या हुशारीने सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत.

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई हेही भारतीयच आहेत. पिचाई यांनी आयआयटी खडगपूर येथून मेटलर्जी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली. चेन्नई येथे जन्मलेल्या पिचाई यांनी स्टँडफोर्ड येथे एमएसची पदवी घेतली. याखेरीज पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सन 2000 मध्ये गूगलच्या सेवेत रुजू झाले. गूगलच्या ‘क्रोम’ ब्राउजरच्या निर्मितीत त्यांचा वाटा मोलाचा मानला जातो. आयबीएम या तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एका अवाढव्य कंपनीच्या नेतृत्वाची सूत्रे 1990 पासून अरविंद कृष्णा या भारतीयाच्या हाती आहेत. आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी इलिनॉय विद्यापीठ, अर्बाना-चॅम्पेन येथून पीएचडी पदवी संपादन केली. गेल्या 30 वर्षांपासून ते आयबीएममध्ये कार्यरत आहेत. हॅथवे कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अजित जैन हे मूळचे ओडिशामधील रहिवासी. व्यापारी कुटुंबात जन्मलेले जैन हे खरगपूर आयआयटीमधून शिकले. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. मॅक्सिने अँड कंपनीत काम केल्यानंतर ते हॅथवे कंपनीत रुजू झाले. प्रसिद्ध उद्योजक वॉरन बफे यांचे ते उत्तराधिकारी मानले जातात.

ऍडोब या आणखी एका मोठ्या कंपनीचे चेअरमन, प्रेसिडेन्ट आणि सीईओ बनण्याचा बहुमानसुद्धा भारतीय वंशाचे शांतनू नारायण यांना मिळाला आहे. त्यांचा जन्म हैदराबादचा. 1998 मध्ये ते ऍडोबचे वरिष्ठ उपाध्यक्ष बनले. 2019 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. नारायण यांनी ऍपल कंपनीतील नोकरीपासून करिअरला सुरुवात केली. त्याचप्रमाणे फाइजर या औषधनिर्मिती कंपनीतही त्यांनी काम पाहिले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना आपल्या व्यवस्थापन सल्लागार मंडळाचे सदस्यत्व बहाल केले होते. फिनलँड येथील दूरसंचार उपकरणे तयार करणार्‍या नोकिया या सुप्रसिद्ध कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओपद भूषविण्याचा मानसुद्धा भारतीय व्यक्तीला मिळाला. राजीव सुरी हे त्यांचे नाव. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्याबरोबरच त्यांनी मंगळूर येथील मणिपाल विद्यापीठातून पदवी संपादन केली होती. नोकिया सोल्यूशन्सचे सीईओ म्हणून सूत्रे स्वीकारण्यापूर्वी त्यांनी कंपनीत अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. इमरसॅट ब्रिटनच्या मोबाइल सॅटेलाइट कंपनीचे ते सध्या सीईओ आहेत. राजीव सुरी यांचा जन्म दिल्लीचा. काही वर्षे ते सुरी होते. त्यांनी सिंगापूरचे नागरिकत्व स्वीकारले आहे. पेप्सिको या शीतपेयाच्या जगातील अग्रगण्य कंपनीच्या प्रमुखपदाची धुरा भारतीय वंशाच्या इंदिरा नुई यांनी सांभाळली. ट्रम्प प्रशासनात सामील असलेल्या भारतीय वंशाच्या त्या दुसर्‍या महिला ठरल्या. 2006 पासून जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे.

ग्लोबल फाउंड्रीज या कंपनीचे सीईओ संजय झा हेही मूळ भारतीय वंशाचे आहेत. बिहारमधील भागलपूरमध्ये जन्मलेल्या संजय झा यांनी यांनी 2014 मध्ये कंपनीत प्रवेश केला होता. सेमीकंडक्टर तयार करणार्‍या या कंपनीत एमएमडी, ब्रॉककॉम, क्वालकॉम आणि एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स चिप तयार केल्या जातात. या कंपनीत प्रवेश करण्यापूर्वी संजय झा मोटोरोला कंपनीचे सीईओ होते. क्वालकॉम या कंपनीतही त्यांनी सीईओ म्हणून भूमिका बजावली आहे. क्रेडिट कार्ड कंपन्यांमध्ये जगात अग्रगण्य असलेल्या मास्टरकार्ड कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आणि सीईओ असलेले अजयपालसिंह बंगा हेही मूळ भारतीय वंशाचे आहेत. मुख्य म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ अशा 100 सीईओंच्या यादीत त्यांना स्थान मिळाले होते. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू या नियतकालिकाने ही क्रमवारी 2014 मध्ये जारी केली होती. अमेरिकेतील डेल्योटी कंपनीचे ग्लोबल सीईओ बनण्याचा बहुमान पुनीत राजन यांना मिळाला आहे. ते मूळचे हरियानातील रोहतक जिल्ह्यातील आहेत. थॉमस कूरियन हे गूगलच्या क्लाउड विभागाचे प्रमुख आहेत.त्यांचा जन्म केरळमधील असून, त्यांचे शिक्षण बंगळुरूमध्ये झाले. बंधू जॉर्ज कूरियन हे नेटऍप कंपनीचे सीईओ आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा