प्रश्न पोलंद दरांचा

देशातील छोट्या आणि मध्यम उद्योगवर बराच परिणाम झाला आहे. दरम्यानच्या काळामध्ये पोलादाच्या किमती वाढल्या आहेत. जे छोटे उद्योग पोलादाचा वापर करतात त्या उद्योगांना तुलनेने कमी दराने पोलादाचा पुरवठा करण्याच्या शक्यतेवर विचार करावा, असे आवाहन उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पोलाद उत्पादन करणार्‍या कारखान्यांना केले आहे. पोलादाचा वापर करणार्‍या छोट्या उद्योगांनी याबाबत केंद्र सरकारकडे अनेक वेळा विचारणा केली होती. त्यानंतर छोट्या उद्योगाची संघटना आणि पोलाद उत्पादकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पोलाद उत्पादकांना छोट्या उद्योजकांना कमी दराने पोलाद पाठवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे गोयल यांनी सांगितले.

छोटे उद्योग मोठ्या कारखान्यांना बर्‍याच उपकरणांचा पुरवठा करतात. त्याचबरोबर हे उद्योग निर्यातही करतात. त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्याची गरज आहे. केंद्र सरकार भांडवल पुरवठा पातळीवर छोट्या उद्योगांना गेल्या काही वर्षापासून प्रयत्न मदत करीत आहे. सरकारच्या सूचनेवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन मोठ्या पोलाद कंपन्यांनी दिले आहे. काही महिन्यापासून कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे पोलादाचे उत्पादन मूल्य वाढले आहे. त्याचा परिणाम इतर क्षेत्रावरही होत आहे. त्यामध्ये रिऍल्टी क्षेत्र आणि वाहतूक क्षेत्राचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा