अर्थवार्ता

वीजेच्या बॅटरीवर चालणार्‍या वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक ही राज्ये अव्वल आहेत, अशी माहिती सरकारतर्फे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच राज्यसभेत दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत देशात विजेवरील 8 लाख 70 हजार 141 वाहने रजिस्टर झाली आहेत. त्यात उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 2 लाख 55 हजार 700 वाहनांची नोंद झाली असून दिल्लीत 1 लाख 25 हजार 347 आणि कर्नाटकात 72 हजार 544 वाहने रजिस्टर झाली आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 52 हजार 506 वाहने रजिस्टर झाली आहेत. बॅटरीवर चालणार्‍या वाहनांचा अधिकाधिक उपयोग देशात व्हावा आणि ही वाहने अधिक स्वस्तात उपलब्ध व्हावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या वाहनांवरील जीएसटी आता 12 टक्क्यांवरून 5 टक्के इतका करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा