लष्कराच्या प्रमुख अधिकार्‍यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळले

4 जणांचे मृतदेह सापडले, इतरांचा शोध सुरू

कन्नूर – तामिळनाडूच्या कन्नूर येथे बुधवारी (दि.8) लष्करी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हे चॉपर भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि इतर दोन अधिकार्‍यांना घेऊन जात होते. रावत यांच्यासह एकूण 14 जण यात प्रवास करत होते. यात रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश होता. त्यातील 4 जणांचे मृतदेह सापडले असून रावत यांचा दुपारी उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते. वृत्तसंस्था एनएनआयच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकार्‍यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अतिशय वाइट होती. ते पूर्णपणे जळालेले होते.

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. क्रॅश होताच हेलिकॉप्टरमध्ये आगीचा भडका उडाला. हेलिकॉप्टरमध्ये 14 जण प्रवास करत होते, असं वृत्त एएनआयने दिलं आहे. यात 4 क्रूमेंबर्ससह 10 प्रवासी होते. सीडीएस जनरल बिपीन रावत यांचाही यात समावेश आहे. रावत यांच्या पत्नी मधुरिका रावतही हेलिकॉप्टरमध्ये होत्या. तसंच ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी सई तेजा, हवालदार सतपाल यांची नावं समोर आली आहे. जनरल बिपीन रावत यांच्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात असून, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत. तसेच तामिळनाडू सरकारच्यावतीनेही चौकशी केली जाणार आहे. अपघातग्रस्तांसाठी पोलिस, लष्कराचे जवान तसेच हवाईदलाचे जवान बचावकार्यात सहभागी झालेले असून, परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा