गावठी कट्टे बाळगणार्‍या दोन जणांना पकडले

अहमदनगर- जिल्ह्यात गावठी कट्ट्यांची खरेदी-विक्रीचे अनेक प्रकार उघडकीस येत असून आता नगर शहरातही गावठी कट्टे सापडत आहेत. नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी (दि.7) सायंकाळी गावठी कट्टे बाळगत फिरणार्‍या 2 तरुणांना स्टेशन रोडवर नगर कॉलेज जवळ दोन गावठी कट्टे आणि काडतुसांसह अटक केली आहे. गणेश अरूण घोरपडे (वय 35), राहुल श्रीरंग अडागळे (वय 30 दोघे रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या दोघांवर गुन्हे शाखेचे कर्मचारी कमलेश पाथरुट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कोतवाली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पकडलेला मुद्देमाल हा 55 हजार सहाशे रुपयांचा असून त्यात दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुस असा मुद्देमाल आहे. गुन्हे अन्वेषणचे अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा