मंगल कार्यालयातून चोरट्यांनी दीड लाखाची रोकड व 3 लाखाचे दागिने पळविले

अहमदनगर- विवाह सोहळ्याची लगबग सुरू असताना चोरट्यांनी डाव साधत वर्‍हाडी मंडळींची दीड लाख रुपयांची रोकड व 3 लाखाचे दागीने असलेली पर्स चोरुन नेल्याची घटना नगर-औरंगाबाद रोडवर पोखर्डी शिवारात असलेल्या एन.आर. लॉन या मंगल कार्यालयात घडली. याबाबत महादेव भीमराज खेडकर (रा.खरवंडी, ता.पाथर्डी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी खेडकर यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा एन.आर. लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. सोमवारी (दि.6) रात्री 10.20 च्या सुमारास स्वयंपाकाची व इतर गडबड सुरू असताना दागीने व रोख रक्कम असलेली पर्स त्यांनी इतर साहित्यासमवेत मंगल कार्यालयात एका बाजुला ठेवलेली होती. या विवाह सोहळ्याच्या तयारीच्या गडबडीत सर्व जण व्यस्त असताना अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये रोकड व 3 लाख रुपयांचे दागीने असा 4 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज असलेली पांढर्‍या रंगाची पर्स सर्वांची नजर चुकवून चोरुन नेली. ही बाब उघडकीस आल्यानंतर आणि विवाह सोहळा पार पाडल्यानंतर मंगळवारी (दि.7) सायंकाळी खेडकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं. वि.क. 379 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा