शिंगवी चष्माघरतर्फे शुक्रवारी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

अहमदनगर – स्व. सुंदरबाई कन्हैय्यालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठान, आनंदऋषीजी नेत्रालय व शिंगवी चष्माघर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त 10 डिसेंबर जामखेड येथे सकाळी 11.00 वाजता मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कॉम्प्युटरद्वारा डोळ्याची तपासणी व इतर अत्याधुनिक तपासण्या करून अल्प दरात गरजू रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून अल्पदरात लेन्स टाकण्यात येईल. शस्त्रक्रिया मोफत असून औषधोपचार, भोजनाची, निवासाची व काळा चष्मा व जामखेड ते नगर येण्या-जाण्याची व्यवस्था मोफत करण्यात येईल. शिबिरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नांव नोंदणी- शिंगवी चष्माघर, जुना कापड बाजार, अहमदनगर, शिंगवी चष्माघर, मेनरोड, जामखेड, मो.नं. 9226122061 या नंबरवर नावनोंदणी करावी, असे आवाहन ट्रस्टचे सेक्रेटरी अजित शिंगवी यांनी केले आहे. गरजू रुग्णांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा