युवा फ्रेन्डस् श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभम जगताप किताब विजेता

अहमदनगर – श्रीरामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत कोपरगांवचा शुभम जगताप यांने मानाचा ‘युवा फ्रेन्डस् श्री’ किताब पटकाविला तर प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू म्हणून प्रविण कुसमाडे व बेस्ट पोजर श्रीगोंद्याचा अस्लम सय्यद ठरला. अहमदनगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व श्रीरामपूर तालुका शरीरसौष्ठव संघटना तसेच सतीष रासकर आणि सागर दुपाटी यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मेनरोड, श्रीरामपूर येथे करण्यात आले होते.

विजयी स्पर्धकांचा रोख पारितोषिके, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विजयी स्पर्धकांची 22 व 23 डिसेंबर रोजी मंचर (जि.पुणे) येथे होणार्‍या शरीरसौष्ठव महाराष्ट्र श्री संघात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जितेंद्र भिंगारदिवे व अध्यक्ष मधुकर गायकवाड यांनी दिली. पंच म्हणून सर्वश्री मयुर दरंदले, सतीश रासकर, अजित गायकवाड, कैलास रणसिंग, सुरेंद्र बोराडे, प्रतिक पाटील, राहुल पैलवान, हनिफ शेख, शब्बीर सय्यद, राहुल कुलकर्णी, सुरत पर्वत यांनी काम पाहिले. स्पर्धकांना सचिव मनोज गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (अनुक्रमे) : 55 किलो वजन गट – रवी सूर्यवंशी, धीरज सोनवणे, धनंजय मोहिते. 60 किलो वजन गट- प्रविण कुसमाडे, रोहित रोकडे, राहिल सय्यद. 65 किलो वजन गट – अस्लम सय्यद, सागर खामकर, गौरव नवले. 70 किलो वजन गट – शुभम जगताप, आकाश कदम, रोहित आव्हाड. 75 किलो वजन गट – जाकिर कुरेशी, फिरोज पठाण, अल्ताफ शेख. 75 वजन गटावरील – मनोज शिंदे, साईराज शिंदे, रोहन निंबाळकर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा