संगीत विशारद व श्रुती निकेतनचे परीक्षांमध्ये नगर येथील दीप्ती खरवंडीकर हिचे उज्वल यश

अहमदनगर – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या एप्रिल 2021 च्या संगीत परीक्षेत श्रुती संगीत निकेतनच्या विद्यार्थ्यांनी यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. अहमदनगर (99) या केंद्रात अनया मुळे, संकेत सुवर्णपाठकी, दीप्ती खरवंडीकर हे विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये प्रथम आले आहेत. दीप्ती खरवंडीकर हिने विशेष योग्यते सह आणि नेहा देवचके व शांतनू भूकन यांनी प्रथम श्रेणीसह विशारद परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

परीक्षा निहाय पुढीलप्रमाणे प्रारंभिक – रमा जोशी, सई बोरुडे, अनया मुळे, राजेश्वरी केदार, प्रवेशिका प्रथम. मिताली बंदी, स्वानंद बांदल, सपना रघुवंशी, सार्थ राऊत, अंशुल मुत्याल, ईशान बल्लाळ, आर्या दसरे, स्वराली जोशी, स्वरा गोंधळी. प्रवेशिका पूर्ण. आर्या काळे, क्षितिजा नवले, मध्यमा प्रथम. अर्णव कुलकर्णी. मध्यमा पूर्ण. केतकी कुलकर्णी, प्रेरणा गटकळ, सुकन्या दैठणकर, सई मुळे, संपतराव मोरे, अलका पेंडसे, स्वामीनी नगरकर, विशारद प्रथम. संकेत सुवर्णपाठकी, भावना कासवा – बोरा, प्रतीक्षा काळे, डॉ. हृषीकेश कुलकर्णी, विशारद पूर्ण, दीप्ती खरवंडीकर, नेहा देवचके, शांतनू भूकन. सर्व विद्यार्थ्यांना प्रचिती खिस्ती, डॉ.धनश्री खरवंडीकर आणि मकरंद खरवंडीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा