आंतरमहाविद्यालय बास्केटबॉल स्पर्धेत ‘सारडा’ला अजिंक्यपद

अहमदनगर- नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालीयन बास्केटबॉल स्पर्धेत पेमराज सारडा महाविद्यालयाने पारंपारिक प्रतीस्पर्धी व बलाढ्या अहमदनगर कॉलेजचा चुरशीच्या अंतीम सामन्यात पराभव करुन अजिंक्यपद पटकावले. दिशान गांधी यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या सारडा कॉलेज संघात हर्षल सेलोत, रोहित असनानी, चिराग शेटीया, कोमल कांबळे, भूषण घाटविसवे, अनिरुध्द बारवकर, शुभम गायकवाड, हर्षल वाकडे यांचा समावेश होता. विजयी संघास क्रीडा शिक्षक संजय धोपावकर व अक्षय कर्डीले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, कार्याध्यक्ष अजित बोरा, डॉ. पारस कोठारी, असेरी सर यांनी प्रत्यक्ष कौतुक केले. तर हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. मोडक सर, मा. सचिव संजय जोशी, ब्रिजलाल सारडा तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षकांनी अभिनंदन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा