मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज मुले अंथरुणात लघवी का करतात?

सामान्यतः तीन वर्षांपर्यंत मुलाला लघवीवर नियंत्रण ठेवता यायला लागते. त्यामुळे तोपर्यंत मुले कोठेही लघवी करतात; पण तीन वर्षाच्या नंतरही मुले अंथरुणात लघवी करत असतील, तर त्याचे कारण शोधून उपचार करायला हवेत. मानसिक कारणांमुळे मुले अंथरुणात लघवी करतात. यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याची इच्छा, रात्री लघवीला बाहेर जाण्याची भीती, रात्री झोपताना पाणी प्यायची सवय, असुरक्षितता यांचा समावेश होतो. या कारणांचा शोध घेऊन त्याचे निराकरण केले, तर ही समस्या सोडवता येईल.

अंथरुणात लघवी करण्याच्या इतर कारणांमध्ये मधुमेह, मूत्राशयाचा जंतूसंसर्ग, मूत्रपिंडाचा दाह, शिश्‍नातून लघवी बाहेर यायला अडथळा, मूत्र बाहेर येण्याचा मार्ग लहान असणे, बद्धकोष्ठ, आतड्यातील कृमींची लागण इत्यादींचा समावेश होतो. क्वचित प्रसंगी मज्जारज्जूत असणार्‍या जन्मजात दोषामुळेही लघवीवरचे नियंत्रण जाते व मूल अंथरुणात लघवी करते. बहुतांश मुलांमध्ये ही समस्या मानसिक कारणांमुळेच असते; पण क्वचित गंभीर कारणेही त्यामागे असू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन तज्ज्ञांकडून तपासणी करून घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा