हसा आणि शतायुषी व्हा!

चौथीच्या वर्गात शाळेचे तपासणीस आले. त्यांनी फळ्यावर एक वाक्य लिहिले.

‘‘रामाने रावणाला मारून टाकली.’’

मग विद्यार्थ्यांना त्यांनी विचारले

‘‘या वाक्यात तुम्हाली विशेष काय दिसले?’’

मुलांना चकविण्यासाठी त्यांनी मुद्दामच व्याकरणाची चूक केली होती.

पण अनेक मुलांच्या ती लक्षात आली नाही.

शेवटी एक मुलगा हात वर करून म्हणाला,

‘’मी सांगतो सर.’’

तपासणीस आनंदाने म्हणाले,

‘’शाब्बास फळ्यावर मी जे वाक्य लिहिले आहे. त्यात तुला विशेष काय दिसलं?’’

‘सर, मला हे विशेष दिसलं की तुमचं हस्ताक्षर वाईट आहे.

तुम्हाला प्रॅक्टीस करायला पाहिजे.’ मुलाने उत्तर दिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा