मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उभारी कायम

कोरोना विषयक निर्बंध दूर झाल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता उत्तरोत्तर वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यात या क्षेत्राची उत्पादकता वाढली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय तब्बल 57.6 इतका मोजला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा पीएमआय 55.9 इतका होता. हा निर्देशांक 50 अंकांच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. आता हा निर्देशांक त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. यावरून आकडेवारीवरून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढण्याबरोबरच मागणी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. रोजगार निर्मितीही वाढत आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून हा निर्देशांक 50 अंकांच्या वर आहे. आतापर्यंत कंपन्या वाढलेल्या उत्पादन खर्चाचा फक्त काही भाग ग्राहकावर टाकत होत्या. मात्र जर नव्या करोनामुळे परिस्थिती बिघडली आणि वाहतुकीत अडथळे आले तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे समजले जात आहे. कच्च्या मालाच्या किमती आणि वाहतुकीचा खर्च वाढत असल्यामुळे आगामी काळामध्ये महागाई वाढण्याचा धोका आहे. असे असले तरी अर्थव्यवस्थेला आता बर्‍यापैकी वेग झाला असल्याचे वातावरण आहे. दुसर्‍या तिमाहीत विकास दर 8.4 टक्के इतका भरला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर 20 टक्क्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे एकूण वर्षाचा विकास दर आता 10 टक्क्यांपेक्षा जास्त होईल असे गृहीत धरले जात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा