आधुनिक सुविधाची आज गरज आहे-महापौर रोहिणी शेंडगे

स्पार्कल ब्युटी इन्स्टिट्यूटच्या स्टीम रूमचे उद्घाटन

अहमदनगर – आज सर्वच ठिकाणी आधुनिक सुविधाची आज गरज आहे हे ओळखून हे स्टीम रूम सुरु करण्यात आले आहे. ब्युटीपार्लर अनेक महिला सुरू करतात पण यामध्ये त्या अपडेट करत नाहीत मात्र अनुजा कांबळे यांनी मराठी इंडस्ट्रीत फिल्मआर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्टचे काम केल्यानंतर त्या 10 वर्षे नगरमध्ये आधुनिक सोयी सुविधा त्यांनी ब्युटी पार्लरच्या माध्यमातून दिल्या आहेत आपण पूर्वी पासून वाफ घेत आहोत आता त्यात बदल होत आहे, बदलत्या जीवनशैली व वेळेचा अभाव यामुळे मोठ्या शहरात स्टीम रूमला मागणी खुप आहे ती नगरमध्ये पण आहे, व्यायाम व स्पा नंतर स्टीम घेणे कधीही फायदेशीर आहे असे सांगून महापौर रोहिणी शेंडगे यांनी शुभेछया दिल्या येथील स्पार्कल मेकअप स्टुडिओ व इन्स्टिट्यूटच्या वतीने नवीन बनविण्यात आलेल्या आधुनिक स्टीम रूमचे उदघाटन महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीना चोपडा, माजी सभापती सुवर्णा गेणाप्पा, डॉ.युगंधरा मिसाळ, रेणुका करंदीकर, संचालिका अनुजा कांबळे व महेश कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना अनुजा कांबळे म्हणाल्या स्टीम रूममध्ये वाफ घेतल्याने आपले आरोग्य चांगले राहते, त्वचा तजेलदार दिसते, चेहरा खुलून दिसतो, सर्दी व खोकल्याचा त्रास कमी होतो, चेहर्‍यावरील छोटी छिद्रे मोकळी होतात व त्वचेतील घाण बाहेर निघते गरम पाण्याच्या वाफेने शरीरावरील मृत त्वचा निघून जाते,ताण तणाव कमी होतो व सध्याच्या परिस्तितीत वाफ घेणे कधीही चांगले आहे. सौ. बोरुडे म्हणाल्या स्टीम रूमची नगरमध्ये गरज होती ती स्पार्कलने पूर्ण केली, स्वत्रंत्र अशी प्रशस्त रूम व त्यामध्ये स्टीम रूम आहे व हे सर्वांचा आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्युटी पार्लरमध्ये येणार्‍या महिलासाठी तसेच जिमचा वापर करणार्‍यासाठी जास्त उपयोगी आहे नगरमधील ज्या महिला उद्योजिका आहेत, व्यावसायिक आहेत त्याचे एकत्रीकरण करून मनपा अंतर्गत त्यांचे प्रश्न सोडवले जातील व त्याचे एक संघटन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला महेश कांबळे यांनी आभार मानले. स्टीम युनिट हे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालू असणार आहे ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकेच्या शेजारी, दिल्लीगेट, अहमदनगर, मो.न.9284930674 वर संपर्क साधावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा