अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थी महेश म्हसे याची भारतीय खाद्य निगमच्या तांत्रिक सहाय्यक पदावर नियुक्ती

अहमदनगर – अहमदनगर महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी महेश म्हसे याची भारतीय खाद्य निगम या भारत सरकारच्या विभागांमध्ये तांत्रिक सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे. भारतीय खाद्य सुरक्षा प्रणाली नियमन करणे, कृषी मूल्य निर्धारित करणे आणि खाद्य सुरक्षा उपाय तसेच स्टॉक तयार करणे इत्यादी या विभागाचे कार्य आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी जैवतंत्रज्ञान विभागातील महेश म्हसे यांनी या विद्यार्थ्याचा कौतुक केले. तर बीपीएचई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजीवन अरसुड, स्पायसर विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपप्राचार्य डॉ अरविंद नागवडे, डॉ सय्यद रजाक, डॉ बाळासाहेब गायकर, प्रा. प्रशांत कटके, बायोटेक विभाग प्रमुख प्रा. राजश्री भोपे आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस म्हणाले, नोकरीच्या बाजारात यशस्वी होण्यासाठी आपण घेतलेल्या पदवीबरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचाही कस लागत असतो. वयाच्या 17 ते 23 या सहा वर्षांच्या टप्प्यात व्यक्तिमत्त्व फुलत असते. त्यामुळे या सहा वर्षांत आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी, प्रगल्भ करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करा, म्हणजे यश नक्की तुमच्या बरोबर असेल, असे त्यांनी सांगितले. अहमदनगर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत वेळोवेळी नोकरी संदर्भातील विविध शिबिर तसेच विविध परीक्षांच्या कार्यशाळाही राबविल्या जातात अशाच मार्गदर्शना मधून विभागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसेच नोकरी संदर्भातील मार्गदर्शनही मिळते. महेश म्हसे या विद्यार्थ्यास जैवतंत्रज्ञान विभागातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा