…म्हणून बंदावते रोगप्रतिकारक शक्ती

अनेकजण आरोग्याबाबत खूप दक्ष असतात. काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुतात. पोषक आहाराचं आणि जीवनसत्त्वयुक्त गोळ्यांचं नियमित सेवन करतात. आजारी माणसांपासून शक्य तितकं लांब रहातात. स्वत:ची प्रत्येक वस्तू बॅक्टेरियामुक्त असेल याची काळजी घेतात. मात्र एवढं करूनही सर्दी, खोकला, तापाचे जंतू त्यांच्या शरीरात प्रवेश करण्यात यशस्वी ठरतात. एवढी काळजी घेऊनही आपण का आजारी पडलो, असा प्रश्‍न डॉक्टरांना विचारला जातो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यामागे काही वेगळी कारणंही असू शकतात. याच कारणांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न… सध्या वायू प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. हे प्रदूषण फक्त फुफ्फुसांवरच आघात करतं असं नाही तर रोगप्रतिकारक शक्तीही कमी करतं. प्रदूषित हवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या ‘टी’ पेशींवर प्रभाव टाकते. त्यामुळे बराच काळ प्रदूषित वातावरणात घालवल्यानंतर आजारपण येऊ शकतं. वातावरणातला हवेचा दर्जा सुधारणं शक्य नसलं तरी चांगला एअर प्युरिफायर आणि दर्जेदार फेस मास्क विकत घेता येईल.

प्रथिनांच्या अतिसेवनामुळेही रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.प्राणीजन्य पदार्थांमधून मिळणार्‍या प्रथिनांमुळे शरीरात ‘वन जीएफ वन’ हार्मोन्सची निर्मिती होते. या हार्मोनमुळे वय वाढण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे दुग्धजन्य उत्पादनं, मांस अशा प्राणीजन्य पदार्थांमधून मिळणार्‍या कॅलरींचं प्रमाण तुम्ही घेत असलेल्या दैनंदिन कॅलरींच्या तुलनेत दहा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, याची काळजी घ्या. यानंतरही त्रास सुरू राहिला तर प्राणीजन्य पदार्थांमधून घेतल्या जाणार्‍या कॅलरींचं प्रमाण पाच टक्क्यांवर आणा. एकाकी आयुष्य जगणार्‍या लोकांवर अधिक ताण येतो. याच कारणामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. म्हणूनच एकटेपणा टाळण्यासाठी प्रयत्न करावा. कुटुंबिय, मित्रमंडळी, सहकारी यांच्यासह अधिकाधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. सर्वांमध्ये मिळून-मिसळून रहाणारे रोगांचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकतात. बैठं काम करणार्‍यांची चयापयच क्रिया मंदावते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पोषक घटक शोषून घेण्याची गती मंदावते. परिणामी, काम बैठं असलं तरी वेळोवेळी हालचाल करा. नियमित व्यायाम करा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा