अहमदनगर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना द्वारे संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा भारतीय लोकशाहीत संविधानाचे महत्व सर्वोच्च आहे-प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस

अहमदनगर- भारतीय लोकशाहीत संविधानाचे महत्व सर्वोच्च आहे. संविधान सर्वांना समान स्थान व संधी उपलब्ध करुन देत असते. उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग करून समाजाच्या विकासासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे.बार्नबस यांनी केले. अहमदनगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे 26 नोव्हेंबर-संविधान दिनानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. या वकृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक संदेश वाळके, द्वितीय सुमित देंडगे, तृतीय ओम भालेकर, उत्तेजनार्थ ओमकार दळवी व यश वाकळे यांना प्राप्त झाले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आकाश होंडे, गौरी परभने, शेख इरम व विशाखा पोखरकर या स्वयंसेवकांनी काम केले.

यासाठी उपप्राचार्य डॉ.अरविंद नागवडे, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब गायकर, उपप्राचार्य डॉ.रजाक सय्यद, आय.क्यू. ए.सी. संचालक डॉ. प्रीतम बेदरकर, इतिहास विभाग प्रमुख डॉ.विजय कदम, रजिस्ट्रार श्री.दीपक अल्हाट, वा.सी.एम.ओ.यु. संचालक डॉ. गोकुळदास गायकवाड, राज्यशास्त्र विभागातील प्रा. विलास नाबदे यांचे सहकार्य लाभले. एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे व डॉ. मालती येवला यांनी आयोजन केले. असरार तांबोळी, शिवानी बोरूडे, घुले मदन, जाधव ऐश्वर्या, ठोंबे स्नेहल, रासकर वैष्णवी, दीपक घोडके, नरवडे रूतिका इ. सर्व एन.एस. एस. स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा