अंतराळात झाला महास्फोट

पृथ्वीपासून सुमारे एक अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर गामा किरणांचा ब्रह्मांडातील सर्वात मोठा स्फोट झाला आहे. खगोलशास्त्रज्ञांनी या दुर्मीळ घटनेची प्रतिमा टिपण्यात यश मिळवले आहे. जर्मनीच्या संशोधकांनी म्हटले आहे की एका तार्‍याचा मृत्यू होऊन त्याचे कृष्णविवरात रूपांतर होण्याची प्रक्रिया यामधून सुरू झाली आहे. हा एक जोरदार गामा किरणांचा स्फोट होता. अवकाशात तो चमकदार एक्स आणि गामा किरणांच्या रूपाने दिसून आला. अंतराळातील फर्मी आणि स्विफ्ट टेलिस्कोपनी नामिबियातील हाय एनर्जी स्टेरिओस्कोपिक सिस्टीम टेलिस्कोपच्या मदतीने हा महाविस्फोट टिपून घेतला. जरी तो सुमारे एक अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर झालेला असला तरी आपल्या ब्रह्मांडीय परिसरातच तो असल्याचे मानले जाते. हा स्फोट म्हणजे ऊर्जेचे आतापर्यंतचे सर्वात मोठे विकिरण होते. त्यावेळी गामा किरणांचा सर्वात लांब प्रकाश निर्माण झाला. सर्वसाधारणपणे गामा किरणांचा स्फोट सुमारे 20 अब्ज प्रकाशवर्ष दूर असतात. या स्फोटाला ‘जीआरबी 190829 ए’ असे नाव देण्यात आले आहे. 29 ऑगस्ट 2019 मध्ये त्याला सर्वप्रथम शोधण्यात आले होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा