नागदेवतेचं अनोख मंदिर

भारतात दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली. दिवाळीचा हा उत्सव त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत असतो. अनेक ठिकाणी देवदिवाळी साजरी होते. मात्र उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात नागदिवाळी असते. या दिवशी नागाची विधीवत पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या पंचमीला हा दिवस साजरा होतो. नागांना पाताळाचे स्वामी म्हटलं जातं. नागदिवाळीला नागाची पूजा केल्याने जीवनातल्या समस्या, संकटं दूर होतात, असं चमोलीतल्या लोकांचं म्हणणं आहे. तसंच पत्रिकेतला कालसर्प दोषही यामुळे दूर होतो, असं म्हणतात. म्हणूनच इथले लोक हा दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. चमोलीतल्या बांण गावात नागाचं एक मंदिर असून इथे नागदेवतेचं अस्तित्व असल्याचं म्हटलं जातं. इथे प्रत्यक्ष नागराज नागमणीचं रक्षण करण्यासाठी बसला असल्याचं सांगितलं जातं. नागमणीच्या रक्षणासाठी नागराज सतत विषाचे फवारे सोडत असतो. त्यामुळे भक्त 80 फूट दुरून नागाची पूजा करतात. तसंच भटजीही डोळे आणि तोंडावर पट्टी बांधून रोजची पूजा करतात. तेजस्वी नागमणीचा प्रखर प्रकाश माणसाची दृष्टी हिरावून घेत असतो. त्यामुळे भटजी डोळ्यावर पट्टी बांधून नागाची पूजा करतात. या मंदिराचे दरवाजे वर्षातून एकदा वैशाख महिन्यातल्या पौर्णिमेला उघडतात. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 8500 मीटर उंचीवर वसलं आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा