निसर्गातील रम्य भटकंती

डिसेंबर-जानेवारी महिना म्हणजे भटकंतीचा काळ. हिवाळ्यात वातावरणही आल्हाददायक असतं. सध्याच्या शहरांमधल्या प्रदूषित हवेत श्‍वास घुसमटत असेल तर तुम्ही शांत, निवांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जाऊ शकता. अशीच काही अनोखी ठिकाणं भारतात आहेत. अशाच काही ठिकाणांविषयी..

हिमाचल प्रदेशच्या सिमल्यापासून 180 किलोमीटर अंतरावर सराहन नावाचं गाव आहे. हे गाव सतलज नदीच्या किनारी वसलं असून इथपर्यंत जाणारा रस्ता नागमोडी वळणांचा आणि निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या रस्त्याने जाताना तुमचा थकवा कुठच्या कुठे पळून जाईल.

गढवाल प्रांतातलं चमोली गावही खूप सुंदर आहे. पर्वतरांगांनी वेढलेलं हे अतिशय सुंदर असं शहर असून इथे मोकळ्या हवेत श्‍वास घेता येईल. इथली हिरवाई हवीहवीशी वाटेल.

नारकंडा हे असंच एक सुंदर ठिकाण असून हे स्थान समुद्रसपाटीपासून 2700 मीटर अंतरावर वसलं आहे. शिवालिक पर्वतरांगांनी वेढलेलं असं हे गाव म्हणजे स्वर्गच जणू. इथे स्कीईंगचा आनंद लुटता येतो. ऑक्टोबर ते मार्च या काळात संपूर्ण नारकंडावर पांढर्‍याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली असते.

उत्तराखंडमधलं पंगोट हे सुद्धा परफेक्ट स्थान आहे. इथलं शांत आणि रम्य वातावरण तुम्हाला नक्कीच रिचार्ज करेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा