इथे पोहोचला नाही कोरोना!

कोरोना विषाणूने जगभरात कहर केला. जगातल्या जवळपास प्रत्येक देशात हा विषाणू पोहोचला. बहुसंख्य देशांमध्ये टाळेबंदी जाहीर करावी लागली. अशा परिस्थितीत जगात एखादं तरी सुरक्षित स्थान असेल का, असा प्रश्‍न अगदी सहज उपस्थित होतो. कोरोना विषाणू न पोहोचणारं एक स्थान या जगात आहे. एका अहवालानुसार सेंट हेलेना नामक बेटांच्या समुहावर कोरोना विषाणू पोहचू शकला नाही. इथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं सांगितलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे इथल्या लोकांनी कोरोनाच्या नियमांचं पालनही केलं नाही. इथे कोणीही मास्क लावलं नाही तसंच सामाजिक अंतरही राखलं नाही. इथल्या लोकांनी फक्त हात धुतले आणि खोकताना तोंडावर हात ठेवला. या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केलं नाही. या बेटावर फक्त पाच हजार लोक राहतात. तसंच इथलं क्षेत्रफळ 120 चौरस किलोमीटर एवढं आहे. कोरोना नसल्यामुळे इथे पर्यटक येतात. दुसरं म्हणजे इथे येणार्‍या पर्यटकांना कोरोना नेगेटिव्ह अहवाल दाखवावा लागतो. तसंच इथून जातानाही कोरोना तपासणी केली जाते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा