बर्फवृष्टीचा अनुभव घेण्यासाठी…

दिवाळीनंतर भटकंतीला सुरूवात होते. त्यातही थंडीत फिरण्याची मजा वेगळीच! थंडीत अनेकांना बर्फवृष्टीचा आनंद घेण्याची इच्छा असते. बर्फवृष्टीचा आनंद घेता येण्यासारखी अनेक ठिकाणं भारतात आहेत. थंडीत फिरायला जायच्या विचारात असाल तर या ठिकाणांचा नक्की विचार करा.

हिमाचल प्रदेशमधलं ऑफबीट ठिकाण म्हणजे तोष. तोष हे हिमाचल प्रदेशातलं एक गाव असून ते कुल्लू जिल्ह्यात वसलं आहे. इथे तुम्ही ट्रेकिंगही करू शकता. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2400 मीटर उंचीवर असून इथे निवांत भटकंती करता येईल.

अरुणाचल प्रदेशमधलं तवांग हे सुद्धा थंडीतलं परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. इथून उंचच उंच पर्वतशिखरं आणि बौद्ध मॉनेस्ट्री पहायला मिळतील. तवांगमध्ये इतरही काही प्रेक्षणीय स्थळं आहेत.

मेघालयही खूप सुंदर आहे. तुम्ही भटकंतीसाठी शिलॉंगला जाऊ शकता. इथे बरेच धबधबे पहायला मिळतील. शिलॉंगच्या आसपासच्या प्रदेशात फिरून वेगळाच अनुभव घेता येईल. अध्यात्माकडे ओढा असेल किंवा रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घ्यायला असेल तर ऋ षीकेशला जायला हरकत नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा