कमरेला गावठी कट्टा लावून फिरणार्‍या तरुणाला पकडले नगर तालुका पोलिसांची रूईछत्तीशी बस स्थानकाजवळ कारवाई

अहमदनगर- गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली. राजू कुंडलीक खाकाळ (रा. रूईछत्तीशी, ता. नगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रूईछत्तीशी एसटी बस स्थानकाजवळ नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. रूईछत्तीशी बस स्थानकाजवळ एक तरूण कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जारवाल, पोलीस अंमलदार बी. एस. गांगर्डे, संतोष लगड, योगेश ठाणगे, भानुदास सोनवणे यांच्या पथकाने खाकाळ याला रूईछत्तीशी बस स्थानकावरून ताब्यात घेत त्याची पंचासमक्ष झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक करत कट्टा, काडतुसे जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस नाईक भानुदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी खाकाळ विरोधात तालुका पोलीस ठाण्यात विनापरवाना शस्र बाळगण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा