जायफळाने टाळा निद्रानाशाची समस्या

जायफळ हे गरम मसाल्यातील एक प्रमुख घटक. चिकन, मटणासारखे मांसाहारी पदार्थ असोत किंवा सणासुदीचे गोडाचे पदार्थ, ‘जायफळा’शिवाय या पदार्थांना रंगतच नाही, पण पदार्थांची चव वाढवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. तज्ज्ञांच्या मते, जायफळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचेची कांती सुधारते तसेच पचनाचे विकारही कमी होतात. निद्रानाशासारख्या दिवसेंदिवस गंभीर होत जाणाºया आजारावर जायफळ फार गुणकारी आहे. आजीबाईच्या बटव्यातील या औषधाला आता विविध संशोधनांचा पाठिंबा मिळाला आहे. जायफळ खाल्ल्याने शरीरात सेरोटीनचे प्रमाण वाढते व शरीर आरामदायी बनते, असे संशोधनातून समोर आले आहे. तसेच जायफळामुळे ताणतणाव हलका होतो व शांत झोप मिळण्यास मदत होते. जायफळाच्या या गुणधर्मांमुळे निद्रानाशावर मात करणे शक्य होते.

कसा कराल जायफळाचा आहारात समावेश – निद्रानाश टाळण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दुधात चिमूटभर जायफळाची पूड व साखर मिसळून दुध प्यावे. भाज्या किंवा आमटीमध्ये जायफळीची पूड घालावी. गोडाचे पदार्थ, स्मुदी अशा पदार्थांमध्ये वेलची सोबतच जायफळाची पूड घालावी. यामुळे चवही वाढते आणि निद्रानाशावर मातही होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा