महापालिकेच्या वतीने मिळकत धारकांना 31 ऑक्टोबर पर्यंत शस्ती मध्ये सूट

अहमदनगर- अहमदनगर महापालिकेच्या वतीने ज्या मिळकत धारकांकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे अशा थकबाकी मिळकत धारकांना 2% शास्तीमध्ये 75% माफी देऊन थकीत मालमत्ता कराचा भरणा करणेकामी 31 ऑक्टोबर अखेर मुदत वाढ देण्यात आली आहे तसेच ही सुविधा प्रत्यक्ष भरणा व ऑनलाईन सुद्धा आहे. असे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी शस्तीमध्ये सूट देण्यात यावी, असे पत्र आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिले आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी पत्रात म्हंटले आहे की कोरोना व्हायरस हे गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठे आर्थिक आणि आरोग्य संकट आहे.यामुळे उत्पादन, रोजगार, आणि नागरिकांच्या आरोग्यावर अभूतपूर्व नकारात्मक परिणाम झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर महापालिका हद्दीतील करदात्यांनी मला भेटून मागणी केली आहे की महापालिकेने मालमत्ताकर भरण्यास या अगोदर मुदत दिली होती परंतु आर्थिक अडचणी मुळे मुदतीत कर भरू शकले नाहीत. या नागरिकांच्या करामध्ये अतिरिक्त दंड (शास्ती) लागलेला आहे. सदर नागरिक मालमत्ता कर भराण्यास तयार आहेत. जर ही शास्ती आयुक्त यांना असलेल्या अधिकारात 75% सूट दिल्यास अनेक करदाते उस्फुर्तपणे थकबाकी भरण्यास तयार होतील. यामुळे थोड्याफार प्रमाणात महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. यातून विकास कामांसाठीही निधी उपलब्ध करता येईल असेही आ. संग्राम जगताप यांनी म्हंटले आहे. सदर पत्राचा विचार करून आयुक्त शंकर गोरे यांनी त्यांना असलेल्या अधिकारात 31 ऑक्टोबर 2021 अखेर 2% शास्ती मध्ये 75% सूट दिली असून नागरिकांनी थकीत मालमत्ताकर भरणा करावा अशी माहिती उपायुक्त (कर) यशवंत डांगे यांनी दिली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा