शिवराज्य ब्रिगेडच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी किरण फटांगरे यांची निवड

अहमदनगर- शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या शिवराज्य ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुंबई अमोल जाधव तसेच महाराष्ट्र संघटन प्रमुख दत्ता चव्हाण, महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय बल्लाळ, चारकोप विधानसभा अध्यक्ष सुशांत विनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी किरण फटांगरे यांची निवड करुन नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी गणेश शिंदे, गणेश सातकर, संदीप साळुंखे, अमोल नायकू, मच्छिंद्र बेरड, अच्युत गाडे, प्रशांत झोडगे, योगेश साळुंके, नवनाथ कापसे, सागर झोडगे, रावसाहेब जावळे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष किरण फटांगरे म्हणाले की संघटनेची ग्रामीण भागामध्ये ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न चालू असून वंचित दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवराज्य ब्रिगेड संघटना नेहमी प्रयत्नशील आहे अनेक सामाजिक विषय हाताळत असताना शिवराज्य ब्रिगेड संघटना वंचितांना आधार बनून कार्य करीत आहे. पुढील वाटचाल जोमाने करणार व युवकांच्या माध्यमातून शिवराज्य ब्रिगेड संघटना मजबूत करणार असल्याचा निर्धार यावेळी फटांगरे यांनी व्यक्त करून निवडीबद्दल त्यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा