‘एक रुपया एक वीट’ हा अभिनव उपक्रम राबविणार्‍या महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची काळात नितांत गरज-चंद्रभान अग्रवाल

अग्रवाल समाजाच्या वतीने गरजूंना किराणा साहित्य कीट, चांगले कपडे व वस्तूंचे वाटप

(छाया- अमोल भांबरकर,अहमदनगर)

अहमदनगर- गावात नवीन येणार्‍या परिवारास एक रुपया एक वीट देण्याची प्रथा महाराजा अग्रसेन यांनी सुरु केली. मदतीत सर्वांचा सहभाग असावा हा हेतू होताच त्याच बरोबर ज्याची जशी क्षमता तसे त्याने सोन्याचा, चांदीचा, अथवा तांब्याचा रुपया द्यावा हा महत्वाचा संदेश होता. ज्याद्वारे सर्वांची मदत एकसमान दिसेल असा हा अभिनव उपक्रम राबविणार्‍या महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत उद्योजक चंद्रभान अग्रवाल यांनी व्यक्त केले. अहमदनगर जिल्हा अग्रवाल समाजाच्यावतीने महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीदिनी महात्मा फुले वसतिगृह माळीवाडा संस्थेस जीवनावश्यक वस्तू, कपडे व साहित्य तसेच सावलीच्या माध्यमातून गरजू परिवारांना किराणा कीटचे मोफत वाटप नगर वाचनालय येथे नगरचे उद्योजक चंद्रभान अग्रवाल, संपदा ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी लखमीचंद गोयल, महेश बन्सल, श्रीमती लीला अग्रवाल, श्रीमती शोभा अग्रवाल, श्रीमती इंदूमती अग्रवाल यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व समाज बंधु-भगिनीच्या हस्ते माता लक्ष्मी व अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.

संपदा ट्रस्टचे लखमीचंद गोयल यांनी त्यांच्या गावी कोटा, राजस्थान येथे अग्रसेन जयंती दिनी होणार्‍या कार्यक्रमाची माहिती दिली. नगरमध्येही जयंतीदिनी भव्य शोभायात्रा काढण्यात यावी तसेच विविध स्पर्धा घेण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. नवरात्र पूर्वी प्रत्येक घरी साफसफाई करताना अनेक वस्तू, कपडे आपण काढतो, मात्र कधीतरी उपयोगी येतील म्हणून पुन्हा ठेवतो व हा पसारा वाढतच जातो.या सर्व वस्तू गरजूंना देण्याचा उपक्रम गतवर्षी राबविण्यात आला. त्यास समाज बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मुलांना न बसणारे सुस्थितीतील कपडे, साड्या, चादरी, विद्युत उपकरणे जमा करू अग्रसेन जयंती दिनी गरजूंना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पोहचविण्यात आली. यंदाही या उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला. तसेच यावर्षी गरजू परिवारांना किराणा कीट पोहच करण्यात आल्या. या पुढे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार असून या सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा अग्रवाल समाजातर्फे करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा