कोंबड्याची भूपाळी

एका कोंबड्याची आणि कुत्र्याची चांगली मैत्री होती. ते नेहमी बरोबर हिंडत-फिरत. एकदा परदेशात फिरायला जावे, असे वाटल्याने ते दोघे प्रवासाला निघाले. वाटेतल्या गमती जमती पाहत त्यांचा प्रवास सुखाने चालला होता. रात्र पडताच त्यांनी एके ठिकाणी मुक्क्काम केला. कोंबडा एका झाडावर चढून बसला, तर कुत्रा झाडाच्या बुंध्याला ड़ोके ठेवून झोपी गेला. पहाटे जाग येताच कोंबडा नित्याच्या सवयीप्रमाणे बांग देऊन ओरडू लागला. हा आवाज एका कोल्ह्याने ऐकला. त्याला वाटले, चला, आज, या कोंबड्याचीच मेजवानी झोडावी. असा विचार करीत तो कोंबडा बसलेल्या झाडाजवळ येत म्हणाला, ‘‘काय कोंबडेभाऊ, किती चांगला आहे तुमचा आवाज. किती छान गाता तुम्ही. तुमची भूपाळी ऐकून मला देव भेटल्याचा आनंद झाला. तेव्हा तुमच्या पायांना हात लावून तुम्हाला नमस्कार करावा, असे मला वाटते.’’ तर कोल्ह्याची लबाडी ओळखून कोंबडा बसल्या जागेवरुन म्हणाला, ‘‘कोल्हेदादा, खाली आमचा पुजारी झोपलाय. त्याला जागे करुन दार उघडायला सांगून आत या.’’ तेव्हा कोल्ह्याला ते खरेच वाटले. तो कुत्र्याजवळ गेला आणि त्याला हलवून जागे करु लागला. जागा होताच समोर कोल्ह्याला पाहून कुत्र्याने झडप घालीतच त्याचे नरडे फोडून त्याला ठार केले.

तात्पर्य – सामान्य लोकही कधी कधी लबाड लोकांना धडा शिकवितात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा