अहमदनगर मिरची मर्चन्ट नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 15% लाभांश जाहीर

अहमदनगर- दि.28 सप्टेंबर रोजी अहमदनगर मिरची मर्चन्ट नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अ.नगर या संस्थेची 21 वी वार्षिक साधारण सभा ऑनलाईन झाली. या सभेचे सूत्रसंचालन सीए किरण हरिकिसन मनियार यांनी केले. या संस्थेच्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन परेश बजाज हे होते. सभेपुर्वी ज्ञात अज्ञात सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सभेच्या अध्यक्षांनी सभासदांना 15% लाभांश जाहीर केला. सोने तारण कर्जाचा व कॅश क्रेडिट कर्जाचा व्याजदर हा 9% केला असून जास्तीत जास्त सभासदांनी याचा लाभ घ्यावा. संस्थेचे व्हा. चेअरमन राजेश गुगळे यांनी सभासदांचे आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा