एस.टी.बसमधून प्रवासादरम्यान महिलेचे सोन्याचे दागिने पळविले- गुन्हा दाखल

अहमदनगर- एस. टी. बस मध्ये प्रवास करीत असताना शेजारी बसलेल्या दोन महिलांनी एका महिलेची सोन्याचे दागीने ठेवलेली पर्स चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.15) दुपारी 1.15 ते 1.45 वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत शोभाबाई विनायक ढोबळे (रा.सुभेदार रामजी आंबेडकर शाळेजवळ, मिसरवाडी, औरंगाबाद) यांनी गुरुवारी (दि.16) दुपारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ढोबळे या औरंगाबादहून नगरला एस.टी. बसने येत असताना बुधवारी (दि.15) दुपारी 1.15 च्या सुमारास घोडेगाव (ता.नेवासा) येथून दोन महिला या बसमध्ये बसल्या व 1.45 च्या सुमारास नगर जवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर त्या बसमधून उतरल्या. यावेळी त्यांनी ढोबळे यांची 54 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने ठेवलेली पर्स चोरुन नेली. ढोबळे यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात 2 महिलांविरुद्ध भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा