मिरवणुक व वाद्यांचा गजर टाळत भिंगारमध्ये शांततेत गणपती विसर्जन

पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केली मानाच्या गणपतीची उत्थान पूजा

(छाया-बबलू शेख,अहमदनगर)

अहमदनगर – दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे भिंगार शहरामध्ये आठव्या दिवशी शुक्रवारी (दि.17) गणेश विसर्जन करण्यात आले. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोना संकटामुळे मिरवणुकीला, वाद्यांच्या गजराला आणि गर्दीला फाटा देत शांततेत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी ब्राह्मण गल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीची उत्थान पूजा करत गणेश मूर्तीचे मंदिरातच ठेवलेल्या विसर्जन कलशामध्ये विसर्जन केले. यावेळी पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, सपोनि शिशिरकुमार देशमुख, समीर देशमुख, कार्तिक देशमुख, प्रज्वल देशमुख, अश्विन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, शिवसेनेचे नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, भिंगार शहरप्रमुख सुनिल लालबोंद्रे, रवींद्र लालबोंद्रे, अनिल मुळे, मोरेश्वर मुळे, गोपाल जोशी, प्रसाद कुलकर्णी, स्वप्निल मुळे, आदी उपस्थित होते.

यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व नियम काटेकोरपणे पाळत प्रथेप्रमाणे भिंगार येथील गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसल्याने सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पोलिस प्रशासन व कॅन्टोन्मेंट बोर्डाने 3 विशेष वाहनांची व्यवस्था केली होती. या वाहनांमध्ये गणेशमूर्ती संकलन करण्याचे उद्घाटन पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सपोनि शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक डी. बी. भोसले, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रमेश ताके, गणेश भोर आदी उपस्थित होते. सदर वाहनांमध्ये संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन गणपती मूर्ती विसर्जनासाठी संकलित करण्यात आले व त्यानंतर भिंगार येथील शुकलेश्वर मंदिराच्या जवळ गणपती विसर्जनासाठी स्वतंत्र असा तलाव केला आहे. त्यामध्ये विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. भिंगार शहरामध्ये साधारणता 47 विविध मंडळांनी गणपती स्थापन केले होते, मात्र दुसरीकडे मिरवणुकीला बंदी व वाद्यांना बंदी असल्यामुळे साधेपणाने विसर्जन केले पाहिजे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पावले उचलली होती. विसर्जन तयारी करता स्वतंत्र अशी पोलिस प्रशासनाची बैठक सुद्धा झालेली होती. या बैठकीमध्ये विसर्जनाची पद्धत कशा पद्धतीने करायचे त्याचे नियोजन केले होते. गणेश विसर्जनाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा