एकम विश्वशांती महोत्सवानिमित्त 19 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन ध्यान उपक्रम

अहमदनगर- अम्मा-भगवानच्या जगभरातील भाविकांसाठी गेल्या वर्षीप्रमाणे शुक्रवार दि.17 पासून ते 19 सप्टेंबर पर्यंत रोज सायं. 6 ते 7 या 55 मिनिटे ऑनलाईन ध्यान उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात भाग घेणार्‍या भाविकांनी पी. के. कॉन्शसलेस किंवा मनोज राजापुरे मो.9518702440 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन नगर शाखेने केले आहे. अम्मा-भगवान यांनी जगाला अमुल्य विचार दिले आहेत. त्यांच्या विचारावर जगातील भक्तगण मार्गक्रमण करीत असून, एकम विश्वशांती महोत्सवाचे हे यंदाचे 4 थे वर्षे आहे. या निमित्ताने ऑनलाईन ध्याय उपक्रमासाठी थेट प्रसारण असून, यामध्ये सर्व शांती साधकांनी सहभागी व्हावे. अम्मा-भगवान यांच्याप्रमाणे आता कृष्णाजी- प्रिताजी हे जगभरातील सर्व शांती साधकांना मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या दर्शनाचा लाभ यावेळी होणार आहे. कोरोना प्रादुर्भाव सध्याही असल्याने जगभरातील लोकांचे जीवन विस्कळीत झाले. असे आघात घडत असले तरी यातून सावरण्याची शक्ती लोकांना अशा उपक्रमातून मिळते. उपक्रमात 2 कोटी शांती साधक भाग घेतील, अशी अपेक्षा आहे. ज्यांना नव्याने भाग घेण्याची इच्छा आहे. त्यांनीही वरील क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा