जिल्हा परिषदेची फकीरवाडा उर्दू शाळा फोडून शैक्षणिक साहित्याची चोरी

अहमदनगर- अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेतील डिजीटल क्लासरुम फोडून अज्ञात चोरट्यांनी 33 हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.15) सायंकाळी 5 ते गुरुवारी (दि.16) सकाळी 10.30 या कालावधीत घडली. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक अंजुम अब्दुल गफूर यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. केवळ शिक्षक शाळांमध्ये येतात. जिल्हा परिषदेच्या फकीरवाडा येथे असलेल्या उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षक बुधवारी (दि.15) सायंकाळी 5 वा. शाळेला कुलूप लावून गेले असता त्यानंतरच्या कालावधीत रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी शाळेत प्रवेश करत शाळेतील डिजीटल क्लासरुमच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला व डिजीटल क्लासरुम मधील प्रोजेक्टर, साऊंड, एलईडी टिव्ही, प्रिंटर, कॉम्प्युटर, माऊस, कि- बोर्ड आदी साहित्य चोरुन नेले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा