केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे हृद्यसत्कार

नाशिक- नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी नाशिक मर्चंट इंडस्ट्रीयल बँकेच्या सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात आशीर्वचन देऊन सत्कार केला. याप्रसंगी ब्रह्माकुमारी पूनम दीदी, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनचे भारतातील राष्ट्रीय सचिव बी. के. डॉ. दीपक हारके, आ. राहुल आहेर, माजी आ. वसंत गिते, व्ही. एन. नाईकचे सरचिटणीस हेमंत धात्रक आदी उपस्थित होते. ब्रह्माकुमारी वासंती दिदींनी डॉ. भारती पवार यांना ब्रह्माकुमारी संस्थेच्या रीतीरिवाजाप्रमाणे आत्मस्मृतीचा टिळक लावला. आपले सर्वांचे आराध्य निराकार शिव परमात्मा असून आपण त्यांची लेकरे आहोत. आपण स्वतःला जाणूनच त्या परमात्म्याचा परिचय प्राप्त करू शकतो. यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे देण्यात येणारा साप्ताहिक राजयोग कोर्स अतिशय महत्वाचा असून आपला दैनंदिन ताण-तणाव सुद्धा राजयोग मेडीटेशननने घालवता येतो, असे प्रतिपादन दिदींनी या प्रसंगी केले. ब्रह्माकुमारी पूनम दिदींनी डॉ. भारती पवार यांना प्रसाद देऊन ईश्वरीय स्मरण भेट वस्तू दिल्या.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन चे भारतातील राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हारके यांनी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन तर्फे डॉ. भारती पवार यांना त्या करीत असलेल्या करोनामुक्तीच्या कार्यासाठी सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट देऊन सम्मानित केले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे यूरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात 70 देशामध्ये कोरोनामुक्ती साठी जनजागृती केली जात आहे. तसेच कोरोना मुक्तीसाठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने व्यक्ती व संस्थाना सम्मानित करण्यात येते. राजस्थानच्या आबू व आबूरोड येथील 60 एकर क्षेत्रात ब्रह्माकुमारी संस्थेचे मुख्यालय वसलेले आहे. येथे आमंत्रित पाहुण्यांसाठी राजयोग शिबीर, कार्यशाळा, संमेलने व अध्यात्मिक ध्यान योग शिबिरांचे आयोजन करण्यात येते. येथे येणारे लोक येथील निसर्गरम्य वातावरण, अध्यात्मिक प्रकंपन व सात्विक भोजन स्विकारून स्वर्गीय सुखाची अनुभूती करतात. अशा अध्यात्मिक ठिकाणी आपल्या तन व मनाचे रिफ्रेशमेंट करण्यासाठी एक वेळेस अवश्य येण्याचे निमंत्रण ब्रह्माकुमारी वासंती दिदिजी यांनी सर्व उपस्थीत पाहुण्यांना दिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा