स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून सराफ व्यावसायिकाला 12 लाख रुपयांस लुटले

अहमदनगर – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून सराफ व्यावसायिकाला व त्याच्या साथीदाराला 7 ते 8 जणांच्या टोळीने जंगलात नेऊन मारहाण करत बारा लाखाला लुटल्याची घटना मंगळवारी (दि.14) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. याबाबत भुवनलाल कन्हैलाल वर्मा (रा. भनोली, जिल्हा अलमोडी, उत्तराखंड) यांनी याबाबत सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्मा हे उत्तराखंड राज्यातील अलमोडा जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक आहेत. त्यांना सुपा भागातील एकाने दुरध्वनीद्वारे संपर्क साधत स्वस्तात सोने देण्याची तयारी दाखवली होती. या व्यवहारासाठी पुणेनगर महामार्गालगत पारनेर तालुक्यातील सुपा-पवारवाडी जवळील झाडी वस्ती येथे भेट ठरली होती. त्यानुसार मंगळवारी (दि 14) दुपारी 2 वाजेच्या दरम्यान वर्मा हा व्यापारी एका सहकार्यावसोबत 12 लाख रूपये रक्कम असलेली बॅग घेऊन या ठिकाणी आला होता.

त्यांना महामार्गाच्या कडेला दोघे जण भेटले, त्यांनी सोने डोंगराच्या खालच्या बाजुस लपवले असून त्या ठिकाणी येण्यास सांगीतले. त्या ठिकाणी अगोदरच तीन ते चारजण दबा धरून बसले होते. व्यापारी वर्मा व त्याचा सहकारी तेथे पोहचताच सर्वांनी त्यांना घेरून पैशांची बॅग हिसकावली. तसेच दोघांना बेदम मारहाण करत सर्वजण तेथून पळून गेले. याबाबत व्यापारी भुवनलाल वर्मा यांनी रात्री उशीरा सुपा पोलिसांना कळवले यानंतर सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला, तसेच वर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात टोळी विरुद्ध भा.दं. वि.कलम 395,420,120 ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा