आनंद, उत्साह, परंपरा व संस्कृतीची ओळख करून देणारा सण गौरी गणपती-उज्वला झिकरे यांचे प्रतिपादन

(छाया-लहू दळवी) 

अहमदनगर- आनंद, उत्साह आणि परंपरा यांची जोपासना करत साजरा केला जाणारा हा उत्सव ही आपली संस्कृती ओळख आहे. महाराष्ट्रात इतर सणाप्रमाणे गौरी गणपतीची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते आमचे झिकरे कुटुंब गौरी गणपतीचा सण, उत्सव सालाबाद प्रमाणे पारंपारिक पध्दतीने मोठ्या थाटात साजरा करतो यानिमित्ताने आम्ही सर्व नातेवाईक व परिसरातील महिला एकत्रित येऊन हळदी-कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतो तसेच गौरी गणपतीच्या आगमना निमित्ताने आकर्षक सजावट केली जाते अंगणामध्ये रांगोळी काढणे, घराची आकर्षक सजावट केली जाते तसेच गौरी गणपती समोर विविध प्रकारचे नैवेद्य दाखवली जातात अशी माहिती उज्वला झिकरे यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा