मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज – उन्हाळ्यात घाम जास्त व लघवी कमी होते, तर हिवाळ्यात लघवी अधिक व घाम कमी येतो. याचे कारण काय असावे?

शरीराच्या तापमानाच्या संतुलनात त्वचेचा मोठा वाटा असतो. त्याचबरोबर पाणी व क्षार यांचे संतुलन राखण्यासाठी मूत्रपिंडाप्रमाणेच त्वचाही कार्यरत असते. अर्थात त्वचा तापमानाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने काम करते. पाणी व क्षार नियंत्रण हा त्याबरोबर आपोआप होणारा परिणाम होय. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त घाम येतो. घामाच्या बाष्पीभवनामुळे शरीराचे तापमान कमी व्हायला मदत होते. घामावाटे जास्त पाणी शरीराच्या बाहेर गेल्याने मेंदूतील केंद्रांच्या नियंत्रणाद्वारे लघवीचे प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात घाम जास्त व लघवी कमी होते. या उलट हिवाळ्यात शरीराला स्वतःचे तापमान कमी करण्याची जास्त गरज असते. त्यामुळे घाम फार कमी येतो. साहजिकच त्यामुळे पाणी व क्षार यांचा समतोल राखण्यासाठी लघवी जास्त होते. माठातून पाणी पाझरते, या पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने माठातील पाणी गार होते. हा अनुभव आपल्याला आहेच. त्याच पद्धतीने शरीरही आपले तापमान घामाद्वारे कमी करते. हिवाळ्यात उलट तापमान कमी असल्याने शरीराची उष्णता वाया घालवायची नसते. म्हणून घाम येत नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा