डोक्याचा भलताच वापर

क्रेडिट कार्ड, ऑनलाईन व्यवहारांबाबतच्या गैरप्रकारांमध्ये बरीच वाढ होते आहे. हा प्रकार फक्त भारतातच घडतो असं नाही तर जगभरातच ही समस्या आ वासून उभी आहे. मध्यंतरी जपानमध्ये अशीच एक घटना घडली. इथल्या एका मॉलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍याने 1300 लोकांच्या क्रेडिट कार्डाचे नंबर लक्षात ठेऊन बरीच खरेदी केली. युसुके तानीगुची असं या कर्मचार्‍याचं नाव आहे. त्याला क्रेडिट कार्डाची माहिती चोरून गैरप्रकार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तानिगुचीचा मेंदू खूपच तल्लख असल्यामुळे तो क्रेडिट कार्डांचे नंबर लक्षात ठेवत असे. इतकंच नाही तर वापरकर्त्याचं नाव, कार्डाची अंतिम तारीख, सीव्हीसी क्रमांक त्याच्या लक्षात रहायचे. त्याने या क्षमतेचा वापर गैरप्रकार करण्यासाठी केला. या माहितीच्या आधारे त्याने ऑनलाईन खरेदी केली. अशाच एका खरेदीदरम्यान त्याची चोरी पकडली गेली. तानीगुचीच्या घरात एक वही सापडली असून त्यात बर्‍याच कार्डांचे नंबर आणि इतर माहिती आढळली. तानीगुचीने आपल्या बौद्धिक क्षमतेचा गैरवापर केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा